बिअर प्या हार्ट अटॅक टाळा, शास्त्रज्ञांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थंड बिअर ही गरमीच्या दिवसांमध्ये मद्यप्रेमींना मोठा आनंद देऊन जाते. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की जे पुरुष रात्रीच्या जेवणाआधी एक बाटली बिअर पितात त्यांच्या शरीरात चांगले बॅक्टेरिया निर्माण होतात त्यामुळे ते नेहमी निरोगी राहतात. तसेच बिअर प्यायल्यामुळे मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या रोगांपासून देखील बचाव होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. परंतु बिअर जास्त प्रमाणात प्यायल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बिअर हा उत्तम पर्याय मानला गेला आहे. बिअर मध्ये हे कमी कॅलरीज असल्यामुळे आणि त्यात आयसो-अल्फा ऍसिडचा समावेश असल्यामुळे चरबी कमी होते. तसेच त्यातील ग्लुकोज चयापचय क्रियेवर सकारात्मक प्रभाव दर्शविते. ज्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

योग्य प्रमाणात बिअर प्यायल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मधील एका अहवालात असे दिसून आले आहे की जे लोक दिवसातून एक ते दोन बिअर पितात त्यांची हाडे मद्यपान न करणाऱ्या पुरुषांपेक्षा मजबूत असतात. तर बिअर प्यायल्याने स्त्रियांच्या मणक्याला फायदा होण्यास मदत होते. परंतु जास्त प्रमाणात मद्यपानामुळे हाडांची घनता कमी होते. व त्याचे इतर दुष्परीणाम जाणवतात.

संशोधनात असे आढळले आहे की मध्यम प्रमाणात बिअर, नियमित व्यायाम आणि माध्यम आहार ठेवल्यास लठ्ठपणा, मधुमेहाचा धोका आणि उच्च रक्तदाब कमी कमी होण्यास मदत होते. बिअरमुळे हृदयाचे आरोग्य राहण्यास मदत होते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांच्या दाव्यानुसार जे लोक दिवसातून एक लहान ग्लास बिअर पितात त्यांना हृदयविकाराचा झटका, एनजाइना किंवा स्ट्रोकचा धोका 50 टक्क्यांनी कमी असतो. बिअरमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात जे रोगांशी लढण्यास मदत करतात.

हॉलंडमधील एका संस्थेने 5,500 लोकांच्या मद्यपानाच्या सवयींचा अभ्यास केला त्यात असे आढळून आले की जे लोक दररोज अर्धा प्याला बिअर घेतात ते त्यांच्या 90 व्या वर्षापर्यंत जगण्याची शक्यता जास्त असते.