
सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ- चिंभळे रस्त्यावर शिरोळेवस्तीजवळ चारचाकी झाडाला धडकल्याने अपघात झाला. या अपघातात वैभव दिवटे हा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला.
वैभव दिवटे हा तरुण महिंद्रा स्कॉर्पिओ (एम एच 16 एटी 5415) चालवत लोणी व्यंकनाथकडून चिंभळ्याकडे चालला होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिरोळेवस्तीजवळ गाडी खड्ड्यात आदळल्याने झाडावर जाऊन धडकली. या अपघातात वाहनचालक वैभव दिवटे याचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी जमलेल्या लोकांनी डॉक्टरांना आणले मात्र त्यापूर्वीच वैभव दिवटे याचा मृत्यू झाला.































































