सेबीची चार कंपन्यांच्या आयपीओला मंजुरी

सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने चार पंपन्यांच्या आयपीओला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या चार कंपन्यांचा आयपीओ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या चार पंपन्यांमध्ये दिल्लीतील अजय पॉल लिमिटेड कंपनी आहे. ही कंपनी रेफ्रिजरेशन सीलिंग सोल्यूशन्स बनवते. दुसरी कोलकाता येथील रीगल रिसोर्सेस आहे. ही कंपनी मक्यावर आधारित एफएमसीजी उत्पादनांची निर्मिती करते. जयपूरमधील लक्ष्मी इंडिया फायनान्स पंपनी आहे. ही एनबीएफसी पंपनी कर्ज आणि वित्तीय सेवा प्रदान करते, तर चौथी पंपनी जयपूरमधील जाजू रश्मी रिफ्रॅक्टरीज आहे. ही कंपनी फेरो सिलिकान, फेरो मँगनीजसारखे स्टील बनवण्यासाठी कच्चा माल तयार करते.