
दुधावर छान जाड आणि घट्ट साय आली तर त्यातून भरपूर आणि चांगले तूप मिळते. दुधावर साय घट्ट येण्यासाठी सर्वप्रथम दूध स्वच्छ भांड्यात गाळून घ्या. त्यात थोडे पाणी टाका. दूध गरम करण्यापूर्वी भांड्याच्या कडांना थोडे तूप लावा. यामुळे दूध तळाशी लागून जळत नाही आणि उतू जात नाही.
दूध गरम करताना नेहमी मंद आचेवर गरम करावे. दूध गरम करताना त्यात थोडे तांदळाचे दाणे टाका. यामुळे दुधावर हमखास जाड आणि घट्ट साय येते. दूध थंड करताना त्यावर जाळीदार आणि छिद्र असलेले झाकण ठेवावे. त्यामुळे वाफ बाहेर पडते आणि सायीवर पाण्याचे थेंब जमा होत नाहीत. त्यानंतर दूध थंड झाल्यानंतर ते 4-5 तास फ्रीजमध्ये ठेवा.




























































