
श्रीनगरच्या कृष्णा धाब्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषींना जेरबंद केल्यानंतर हिंदुस्थानी सुरक्षा बलांनी अनंतनागच्या जंगलात दहशतवाद्यांनी लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा रविवारी जप्त केला. त्यात 3 एके 47 रायफल्स, 2 चिनी पिस्तुले, 2 चिनी हातबॉम्ब, 1 दुर्बीण, 6 एके 47 मॅगझिन्स आणि अन्य साहित्यांचा समावेश होता. जम्मू- कश्मीरात वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी लष्कर आणि कश्मीर पोलिसांनी कश्मीर खोऱ्यात बंदोबस्त आणि गस्त वाढवली आहे. जम्मू-कश्मीरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर कडक सुरक्षा आणि लक्ष ठेवण्याचे आदेश जम्मू-कश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी दिले आहेत.





























































