इमारतीचा सुरक्षा रक्षकच बनला हैवान; दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
girl-rape

इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने दोन अल्पवयीन सख्या बहिणींशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढव्यात घडला आहे. याप्रकरणी चंद्रकांत वाटाडे (वय 48) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील एका सोसायटीत चंद्रकांत सुरक्षरक्षक म्हणून काम करतो. गेल्या काही वर्षांपासून तो सुरक्षारक्षक आहे. काही दिवसांपूर्वी त्याने लिफ्टमध्ये तक्रारदारांच्या दोन्ही मुलींसोबत अश्लील चाळे करत त्यांचा लैंगिक छळ केला. तो काही दिवसांपासून हा घाणेरडा प्रकार करत असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. शहरात सोसायटीचे सुरक्षा रक्षक असे प्रकार करत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.