विलगीकरण कक्षात नऊ महिन्याच्या बाळासह सर्वांची दर्जेदार व्यवस्था, नूतन संस्थेचा सिंहाचा वाटा

470

सेलू येथील नूतन शिक्षण संस्थेच्या श्रीरामजी भांगडीया वसतिगृहात विलगीकरणं कक्षात असलेल्या नागरिकांची अत्यंत दर्जेदार व्यवस्थाच होत आहे. यामध्ये 9 महिन्याच्या बाळाची सुद्धा तेवढीच काळजी घेतली जात आहे. नूतन संस्थेचा यात मोठा वाटा आहे.

नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी,तलाठी मुकुंद आष्टीकर,तसेच कक्षाचे समन्वयक प्रा.नागेश कान्हेकर हे प्रामुख्याने परिश्रम घेत आहेत. त्यांना मुख्याध्यापक राम मैफळ, पद्माकर जाधव,प्रा.संजय पिंपळगावकर,महेश कुलकर्णी हे देखील साथ देत आहेत. या कक्षात सध्या एकूण 65 लोकांचा समावेश आहे.या लोकांना दिवसातून 2 ते 3 वेळा चहा, सकाळच्या सुमारास नाश्ता, दुपारी व रात्री जेवण अशी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.यासाठी विविध सामाजिक संस्था व शहरातील दानशूर नागरिक पुढे आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या