
साठी गाठलेले ज्येष्ठ लुटारू, गुन्हेगारांचे सॉफ्ट टार्गेट ठरू लागले आहेत. वृद्धांच्या असहाय्येतचा गैरफायदा उचलत त्यांच्यावर होणाऱया हल्ल्यांचे प्रमाण देशभरात वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गुह्यांची कारणे कुठलीही असली तरी देशात हे गंभीर चित्र असून त्यात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या वर्ष 2018 मधील आकडेवारीतून उघड झाले आहे.
साठी गाठली की ज्येष्ठ नागरिक असहाय्य होतात. मग त्यांचा गैरफायदा उचलला जातो. दररोज कुठे ना कुठे ज्येष्ठ महिला किंवा पुरुषांना एकटे गाठून सोनसाखळी चोर त्यांना सर्रास टार्गेट करतात. तर बोगस पोलीस, लुटारू, बँकेत पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने भामटे ज्येष्ठांची फसवणूक करतात. प्रॉपर्टी तसेच लुटमारीच्या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांचे बळी घेतले जातात. चोरीच्या उद्देशाने हत्येचा प्रयत्न करणे, विविध माध्यमांतून फसवणूक करणे हे आणि अशाप्रकारे देशभरात ज्येष्ठांच्या विरोधात घडणाऱया गुह्यांची संख्या वाढली आहे. 2018 वर्षातील अशा गुह्यांची आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने प्रसिद्ध केली आहे. गंभीर म्हणजे महाराष्ट्रासारखे राज्य ज्येष्ठांवर होणाऱया हल्ल्यांच्या प्रकरणात अग्रेसर ठरले आहे.





























































