सेप्टिक टँकची सफाई करताना सहा जण गुदमरून दगावले

828

सेप्टिक टँकची सफाई करताना सहा जण गुदमरून दगावल्याची घटना झारखंड येथील देवघर जिल्ह्यात घडली आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्य असल्याची माहिती मिळत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, झारखंड येथील देवघर जिल्ह्यात देवीपूर तालुक्यात ही घटना घडली. येथील एका घरातील सेप्टिक टँक साफ करण्यासाठी एक मजूर तो उघडून त्यात उतरला होता. तो बराच वेळ बाहेर आला नाही, म्हणून दुसरा मजूर त्याला पाहण्यासाठी उतरला. तोही बाहेर आला नाही म्हणून आणखी एक मजूर त्या टँकमध्ये उतरला. असे करता करता सहा जण त्या टँकमध्ये उतरले. मात्र, तिथेच गुदमरून मरण पावले.

ज्या घराचा सेप्टिक टँक साफ करायचा होता, ते घर काही महिन्यांपूर्वीच बांधलं गेलं होतं. आणि त्याचं सेट्रिंग उघडलं नव्हतं. त्यामुळे तेच उघडण्याचा प्रयत्न हे मजूर करत होते. मात्र, त्या दरम्यान ही भयंकर घटना घडली. जेसीबीच्या साहाय्याने या टँकमधील लोकांना वर काढण्यात आलं. यात गोविंद मांझी आणि त्यांचे दोन मुलगे बबलू आणि लालू अशा दोघांचा समावेश आहे. या घटनेत घराचा मालक ब्रजेश चंद बरनवाल याच्यासह त्याचा भाऊ मिथिलेश आणि लीलू मुर्मू अशा अन्य तीन जणांचाही मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या