Video : नाल्यावरील पूल पार करताना सात गुरं गेली वाहून

41

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

गोंडपिपरी तालुक्यात धाबा गावातील ओसंडून वाहणाऱ्या नाल्यावरील पूल पार करताना सात गुरं पाण्यात पडली. यातील पाच कशीबशी बाहेर आली, तर दोन गुरं वाहून गेली.

दोन महिने उसंत घेतलेल्या पावसाने गोंडपिपरी तालूक्याला झोडपुन काढले. लहानमोठे नाले दूथडी भरुन वाहत आहेत. धाबा गावापासून जवळच असलेला मोठा नाला आणि गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या लहान नाल्याचे पात्र फुगले. याच नाल्याच्या पुलावरुन जवळपास तीन ते चार फुट पाणी वाहत होते. अशात गुराढोरांचा कळप पूल पार करण्यासाठी गेला. मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पुलावरुन जाणारी सात जनावरे नाल्यात कोसळली.

आपली प्रतिक्रिया द्या