इस्रायलच्या हल्ल्यात स्वयंसेवी संस्थेचे सात जण ठार

गाझा भागात अन्नवाटपाचा उपक्रम सुरू केलेल्या द वर्ल्ड सेंट्रल किचन या स्वयंसेवी संस्थेचे सात विदेशी स्वयंसेवक इस्रायलने त्यांच्या मोटारीवर केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झाले. मोटरचालक आणि दुभाषा असलेला एक पॅलेस्टाईनी नागरिकही हल्ल्यात मारला गेला. या हल्ल्यानंतर संस्थेने येथील मदत कार्य थांबवले असून मदत साहित्य घेऊन आलेली जहाजेही परत वळवली आहेत. इस्रायली लष्कराने हा अपघाताने झालेला हल्ला होता असे म्हटले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. संस्थेचे प्रमुख प्रख्यात शेफ जॉस अँड्रेस यांनी गाझातील हल्ल्यात निधन झालेल्या त्यांच्या सहकाऱयांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.