वीज कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून यात चार जण जखमी झाले आहेत. या चार जणांची प्रकृती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या बलौदा भागात तलावाकाठी काही लोक बोलत होते. तेव्हा जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसात जोरदार वीज कोसळली. यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे सात जणांच्या मृत्यूची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली आहे.