
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
गेल्या काही दिवसांत भाजपमध्ये विविध क्षेत्रातून दिग्गजांनी प्रवेश घेतला आहे. आता सैन्यातील निवृत्त अधिकार्यांनीही भाजपमध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे. शनिवारी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत सात निवृत्त सैन्याधिकार्यांनी प्रवेश घेतला आहे.
Seven veteran officers join BJP in the presence of Smt. @nsitharaman at BJP HQ in New Delhi. #ModiAaneWalaHai pic.twitter.com/hua5Vb5ZJZ
— BJP (@BJP4India) April 27, 2019
7 अधिकार्यांपैकी 6 लष्करातील अधिकारी आहेत तर एक वायुसेनेतील अधिकारी आहे. 5 अधिकारी निवृत्त लेफ्टनंटर जनरल असून एक निवृत्त कर्नल आहेत. तर एक माजी विंग कमांडर आहेत. यापूर्वी भाजपमध्ये निवृत्त जनरल शरत चंद यांनीही सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश घेतला होता





























































