नवरात्र सातवा दिवस – देवी कात्यायनीला वरदायिनी देवी का म्हणतात? वाचा सविस्तर…

शारदीय नवरात्रोत्सव देशभरात उत्साहात साजरा होत आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीत पुजा होणारी सहावी देवी कात्यायनी असून यंदा 10 दिवसांचे नवरात्र आल्याने यंदा नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. कात्यायनी देवी हे दुर्गेचे सहावे रूप आहे. देवी कात्यायनीला प्रसन्न करून इच्छित वर मिळवता येतो, अशी मान्यता असल्याने देवी कात्यायनीला वरदायिनी असेही म्हणतात.

देवी कात्यायनीची पूजा केल्याने अविवाहितांचे विवाह लवकर जुळतात, अशी मान्यता आहे. देवी कात्यायनी सिंहारुढ असून ती चतुर्भुजा आहे, म्हणजे तिला चार हात आहेत. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कमळाचे फूल आहे. तर दोन हातांनी देवी भक्तांना आशीर्वाद देते. नवरात्रीत देवी कात्यायनीची पूजा केल्यास इच्छित कामना पूर्ण होतात, त्यामुळे देवी कात्यायनला वरदायिनी म्हणतात.

नवरात्रीच्या सातव्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर, देवी कात्यायनीचे ध्यान करावे आणि दिवा लावावे. त्यानंतर, नवरात्री कलश आणि सर्व देवतांची पूजा करावी. देवी कात्यायनीची पूजा करताना, तिला मध अर्पण करावे. नैवेद्य दाखवल्यानंतर, “ओम देवी माँ कात्यायनी नम:” या मंत्राचा जप करावा आणि देवी कात्यायनीला फुले अर्पण करावी. देवी कात्यायनीची पूजा केल्यानंतर, ब्रह्मा आणि विष्णूचीही पूजा करा, अशाप्रकारे देवी कात्यायनीची पूजा करण्यात येते.