
सामना ऑनलाईन । मुंबई
रुपेरी पडद्यावर जे दिसतं ते खरं नसतं, पण पडद्यावर येण्यापूर्वी त्यामागे काय घडतं याच्या धक्कादायक गोष्टी आता बाहेर येऊ लागल्या आहेत. त्या खऱया की खोटय़ा याचा खुलासा यथावकाश होईलच. मात्र तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या प्रकरणानंतर बॉलीवूडमधील ‘मी टू’ मोहीम लाइमलाइटमध्ये आली आहे हे नक्की.
‘क्वीन’ कंगनाची खळबळ
‘क्वीन’ कंगना राणावतने दिग्दर्शक विकास बहल हे सेक्ससंबंधीच्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचे असे सांगत खळबळ उडवून दिली आहे. जेव्हा सार्वजनिक ठिकाणी आमची भेट व्हायची त्यावेळी ते गळाभेट घ्यायचे. ते त्यांचा चेहरा माझ्या मानेजवळ आणायचे. तुझ्या केसांचा सुगंध खूप आवडतो असे ते म्हणायचे. त्यांच्यापासून दूर होण्यासाठी मला खूप ताकद लावावी लागायची असे कंगनाने म्हटले आहे.
तनुश्रीची पोलिसांत तक्रार
नाना पाटेकर उद्या सोमवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडणार आहेत तर नानावर लैंगिक शोषणाचा आरोप करत तनुश्री दत्ताने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यात नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यचेही नाव नमूद केले आहे.
कैलाशची खैर नाही
प्रसिद्ध गायक कैलाश खेरवर एका महिला पत्रकाराने आरोप केले आहेत. संबंधित फोटो जर्नालिस्ट महिला कैलाश खेरच्या घरी मुलाखतीसाठी गेली होती. याबाबत ट्विट करताना ती म्हणते, मुलाखत देताना कैलाश सतत माझ्या मांडीवर हात ठेवत होता. या पत्रकाराने मॉडेल जुल्फी सयादवरही लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
summary- sexual harassment cases in bollywood





























































