Video – शाहरूख खान लालबागच्या राजाच्या चरणी लीन

‘जवान’ चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) याने आज मुंबईत लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेतले. यावेळी त्याचा छोटा मुलगा अबराम (Abram khan) हा देखील त्याच्यासोबत होता.

शाहरूख आणि अबराम हे दोघेही भक्तिभावाने लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले. यावेळी शाहरूखने दानपेटीमध्ये दानही टाकले आणि त्यानंतर कपाळी टिळाही लावला. यानंतर मंडळाच्यावतिने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाहरूखचा फोटो काढण्यासाठी झुंबड उडाली होती.