आमचे ‘आमदार’ हरवले आहेत, पोलिसात तक्रार दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
भाजपला पाठिंबा देणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांपैकी सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले असले तरी अद्याप अजित पवार सोडले तर इतर चार आमदारांचा थांग पत्ता लागलेला नाही. हे आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत, त्यांना दिल्लीला पाठविण्यात आले आहेत अशी चर्चा सध्या सुरू आहे. या आमदारांचे फोन देखील बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क देखील होऊ शकलेला नाही. या बेपत्ता आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा हे देखील आहेत. त्यामुळे दरोडा बेपत्ता झाले असल्याची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. ही तक्रार शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दाखल केली आहे.
दौलत दरोडा हे शुक्रवार रात्रीपासून बेपत्ता असल्याचे त्यांचे पुत्र करण दरोडा यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितले. त्यांचे कुटुंबीय तणावात आहेत. शहापूर तालुक्यात व मतदारसंघात ओल्या दुष्काळाने शेतकरी त्रस्त आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी हजर असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर शोधकार्य सुरु करावे, असे या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली तेव्हा दौलत दरोडा हे त्यांच्यासोबत राजभवनात उपस्थित होते. मात्र तेव्हापासून त्यांचा फोन बंद असून ते कुठे आहेत याबाबत कुणालाही माहित नाही.