
शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्यावर बुधवारी गडहिंग्लज तालुक्यातील मूळ गावी उंबरवाडी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जोतिबा यांच्या नऊ वर्षांच्या अथर्वने वडिलांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. त्यानंतर त्याने वडिलांना अखेरचा सॅल्यूट करताच उपस्थित जनसमुदायाला गहिवरून आले. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘शहीद जवान जोतिबा चौगुले अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.




























































