शाहीन बागेतील आंदोलनकर्ते गृहमंत्री शहांना भेटण्याची शक्यता, मागितली वेळ

895
amit-shah

दिल्लीतील शाहीन बागेत गेली दोन महिने CAA, NRC आणि NPR विरोधात महिलांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील प्रत्निधी गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी गृहमंत्र्यांकडे वेळ मागितली आहे.

सरकारने आमच्याशी चर्चा करावी अशी विनंती शाहीन बागेतील आंदोलनकर्त्या महिलांनी केली होती. परंतु चर्चेसाठी तुम्हाला सरकारकडे यावे लागेल असे सरकारकडून सांगण्यात आले. जर आंदोलनकर्त्यांना चर्चा करायची असेल तर त्यासाठी सरकार तयार आहे असे कायदार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले होते.

एका खासगी वृत्तसंस्थेशी बोलताना अमित शहा म्हणाले की ज्यांना या कायद्याबद्दल चर्चा करायची असेल त्यांनी माझ्याशी चर्चा करावे. शहा यांनी वेळ घेण्यासाठी तीन दिवसांचा अवधीही दिला होता. आता शाहीन बागेतील आंदोलनकर्त्या महिलांच्या प्रतिनिधींनी शहा यांची उद्या दुपारची दोन वाजताची वेळ मागितली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या