
स्वतःला पाटण मतदारसंघाचे नेते समजणारे ऐन पुरपरिस्थितीत तालुक्यातील जनतेला पुराच्या वेढ्यात सोडून परदेश वाऱ्या करीत फिरत होते.आम्ही यांच्यासारखे फिरत राहिलो असतो तर पाटण मतदार संघात 18 हजार कोटींची विकासकामे उभीच राहिली नसती. येत्या 24 तारखेला कळेल अठराशेवर किती शून्य असतात, असा टोला आमदार देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना नाव न घेता लगावला.
नाडे येथील कृष्ण लिला गार्डन मंगल कार्यालय येथे आयोजीत प्रचारसभेत बोलत होते.यावेळी जिल्हा परीषद सदस्य विजय पवार,सरपंच विष्णू पवार,जयवंत पवार,बबनराव भिसे, डॉ प्रदीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. पाच वर्षे घरात बसून सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या आणि केवळ निवडणूक आली की, जनतेच्या दारात जाऊन सर्वसामान्य जनतेची बुद्धिभेद करून मते मागणाऱ्या विरोधकांनी गेल्या पाच वर्षात काय केले, असा सवाल आमदार शंभुराजे देसाई यांनी केला. पाटण विधानसभा मतदारसंघाचा विकासाला गती देण्यासाठी मला पाठबळ द्यावे. तसेच महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही माझेबरोबरीने मतदान करावे, असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.





























































