शमिता शेट्टीला एंडोमेट्रियोसिस आजार

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता शेट्टीला एंडोमेट्रियोसिस आजार झाला असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शमिता शेट्टी हिने स्वतः एक व्हिडीओ शेअर करून यासंबंधी माहिती दिली. देशातील 40 टक्के महिला या एंडोमेट्रियोसिस आजाराने ग्रस्त आहेत. तसेच यातील अनेक जण या आजाराबद्दल अनभिज्ञ आहेत, असे शमिताने म्हटले आहे. शमिता शेट्टी हॉस्पिटलमध्ये असून तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे.