‘नेवासा’ मतदारसंघातील अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांचा शिवसेनेला पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेवासा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. आता पर्यंत पाच अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 61 वर पोहचले आहे. शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर यांनी सोमवारी नेवासा मतदारसंघाचे  आमदार शंकरराव गडाख यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी शंकरराव गडाख यांचे वडील यशवंतराव गडाख आणि बंधू प्रशांत गडाखही उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा केल्यावर मिलींद नार्वेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून गडाख कुटुंबाला संपर्क साधून दिला. त्यानंतर शंकरराव गडाख आणि प्रशांत गडाख यांना मिलींद नार्वेकर यांनी मुंबईत मातोश्रीवर आणले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले.