
पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांचा डाव होता. सरकार स्थापन करण्यापूर्वी पवारांसोबत बैठक झाली होती. मात्र शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी पवारांनी माघार घेतली, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.
शरद पवार यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. फडणवीस यांच्या दाव्याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, त्यांनी मुख्यमंत्रीपदाशी शपथ (2014) घेतली तेव्हा आम्ही बाहेरून पाठिंबा देईल असे म्हटले होते. सरकार बनवायला लोकं कमी पडत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला बाहेरून पाठिंबा देईल असे जाहीरपणे बोललो होतो. मात्र ती वेळ आली नाही. पाठिंबा देण्यामागे काही कारण होते, त्याचे फार कौतुक होते असे नाही. तो त्या काळचा प्रश्न होता.
ते पुढे म्हणाले की, नंतरच्या काळामध्ये (2029) ते भेटले ही गोष्ट खरी आहे. अनेक गोष्टींची चर्चा झाली ही गोष्टही खरी आहे. त्यांनी स्वत:च सांगितले काल की यासंबंधीचे धोरण मी बदललं दोन दिवसांनी. दोन दिवसांनी मी धोरण बदलले तर त्याच्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचे काय कारण होते? शपथ घ्यायची होती तर अशी चोरून का घेतली पहाटे? त्यांना पाठिंब्याची खात्री होती तर दोन दिवसात सरकार का पडलं? दोन दिवसात त्यांची सत्ता गेली. त्यांना राजीनामा द्यावा लागला.
सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो ही जी त्यांची पावलं होती ती पावलं एकदा समाजाच्या समोर यावीत या दृष्टीने काही गोष्टी केलेल्या होत्या. आम्ही सत्तेसाठी किती अस्वस्थ आहोत, त्याच्याशिवाय आम्ही कसे पुढे जाऊ शकत नाही, जगू शकत नाही. ही त्यांची अस्वस्थता एकदा महाराष्ट्रासमोर येण्याची आवश्यकता होती, असा टोला पवारांनी लगावला.
गृहमंत्र्यांनी वायफळ विधानं करण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, पवारांचा फडणवीसांना टोला
सत्ता स्थापनेबाबत बैठक झाली होती की नाही? असे विचारले असता पवार म्हणाले की, चर्चा सगळ्या झाल्या. काहीही करून त्यांना आमची मदत हवी असेल अशा गोष्टी चर्चेशिवाय शक्य नसतात. मी आयसीसीचा अध्यक्ष होतो. त्यामुळे क्रिकेट खेळलो नसलो तरी मला गुगली कशी आणि कुठे टाकायची माहिती होते. भडणवीस यांनी विकेट दिलीच तर सोडणार कशी? आणि विकेट गेलेला माणूस विकेट गेली म्हणून सांगतो का?असा टोलाही पवारांनी लगावला.
विरोधकांच्या पुढील बैठकीचं ठिकाण बदललं; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

























































