नातेवाईकांबाबतच्या प्रश्नावर पवार भडकले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शरद पवार – 1) 18 जुलै, 1978 ते 17 फेब्रुवारी, 1980 (पुलोद), 2) 26 जून, 1988 ते 25 जून 1991 (काँग्रेस), 3) 6 मार्च, 1993 ते 14 मार्च, 1995 (काँग्रेस)

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीमुळे शरद पवार अस्वस्थ झाले आहेत. पद्मसिंह पाटलांसारखे जवळचे नातेवाईक भाजपच्या वाटेवर असल्याची विचारणा होताच भर पत्रकार परिषदेत पवार यांचा पारा चढला.

श्रीरामपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना एका पत्रकाराने पवार यांना तुमचे नातेवाईक असणारे पद्मसिंह पाटील तुमची साथ सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचे विचारताच शरद पवार चांगलेच संतापले. राजकारणात नातेकाईकांचा काय संबंध? तुम्ही चुकीचे बोलत आहात, असे प्रश्न तुम्ही कसे काय विचारू शकता? तुम्ही माफी मागा, असे म्हणत पत्रकारावर आगपाखड केली. पवार पत्रकार परिषद सोडून जाऊ लागले. मात्र सोबतचे नेते आणि पत्रकारांनी पवार आणि प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शांत केले. सभ्यता न पाळणाऱ्या लोकांना तुम्ही बोलावत जाऊ नका, त्यांना बोलवायचे असेल तर
मला बोलवू नका, असेही त्यांनी सुनावले.

नेते बाहेर पडले पण कार्यकर्ते पक्षासोबत
जेव्हा 60 आमदार निवडून आले होते त्यावेळी 52 आमदार बाहेर पडले. पुन्हा स्वबळावर सर्व जागा निवडून आणल्या. बाहेर पडल्याने कोणाचे नुकसान होत नाही. बाहेर पडलेल्यांचा विकास याच पक्षातून झाला. नेते गेले पण कार्यकर्ते आमच्याबरोबर असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.