Sharad Pawar Narendra Modi Meeting Live Update – मविआ सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेत येणार – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. दोघांमध्ये 20-25 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीनंतर पवार यांनी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेचे हे लाईव्ह अपडेट आहेत.

  • राज ठाकरे आधी भाजप विरोधी होते आता ते बदलले आहेत.
  • राज ठाकरेंच्या बोलण्यावर मी फार लक्ष देत नाही
  • महाराष्ट्रातील मविआ सरकारला कोणताही धोका नाही, अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. उरलेली अडीच देखील पूर्ण करू
  • मविआ सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेत येणार
  • दुसऱ्यांच्या सांगण्यांवरून राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही
  • राष्ट्रवादी-शिवसेना भाजप विरोधात आहे.
  • भाजप सोबत कोणतेही संबंध ठेवणार नाही
  • राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही
  • मविआ सरकारचं सर्व चांगलं चाललं आहे.
  • भाजपसोबत आमचे कोणते संबंध नाहीत व नव्हते – शरद पवार
  • यूपीएची जबाबदारी घ्यायला मी तयार नाही असे मी आधीच सांगितले आहे.
  • दोन्ही विषयांवर मोदी नक्कीच विचार करतील व निर्णय घेतली अशी अपेक्षा
  • तसेच संजय राऊत हे खासदार आहेत, सामनाचे संपादक आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. त्यांच्यावर अन्याय होत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली
  • महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 12 आमदारांची नावे दिल्यानंतर दीड वर्ष उलटूनही राज्यपालांनी त्यावर अजून निर्णय घेतला नाही. हा पहिला मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मांडला.
  • भाजप विरोधात बोलल्याने संजय राऊतांवर कारवाई
  • संजय राऊतांवरील कारवाई अन्यायकारक
  • अ़डीच वर्ष झाले तरी विधानपरिषदेत सद्सय निवडलेले नाहीत.
  • विधानसपरिषदेच्या सदस्यांबाबत चर्चा झाली, 12 आमदारांचा मुद्दा मांडला – शरद पवार
  • तपास यंत्रणांच्या कारवाईंबाबत काहीच चर्चा केलेली नाही.
  • संजय राऊतांबाबतचा मुद्दाही पंतप्रधानांमसोर मांडला – शरद पवार
  • लक्षद्विपच्या काही मूलभूत सुविधांसाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली. – फैजल
  • तेथील 75 हजार लोकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. – फैजल
  • प्रफुल के पटेल यांना लक्षद्वीपचे अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून नेमण्यात आल्यापासून तिथल्या रहिवाशांचे जगणे अवघड झाले आहे.
  • लक्षद्विपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे काही निर्णय चुकीचे – फैजल
  • लक्षद्विपचे राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल हे देखील पत्रकार परिषदेला उपस्थित