Lok Sabha Election 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत रोड शो होत आहे. या रोड शोसाठी मुंबईकरांना महायुतीने वेठीस धरले आहे. अनेक रस्ते, मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लोकांचे मेगा हाल होत आहेत. दरम्यान संपूर्ण राज्यभर मोदी सभा घेत असताना मोदींनी मुंबईत सभा का घेतली नाही असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. त्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एक पोस्ट शेअर करत महायुतीवर टीका केली आहे.
भ्रष्टाचारी व घोटाळेबाज उमेदवारांवर बोलण्याची वेळ येऊ नये यासाठीच सभा टाळून, भाषणबाजी टाळून मोदींनी फक्त रोडशोचाच आग्रह केला आहे! pic.twitter.com/0nuqvWkytV
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 15, 2024
राष्ट्रवादी काँग्रेसने शेअर केलेल्या पोस्टमध्ये राहुल शेवाळे, यामिनी जाधव व रविंद्र वायकर या उमेदवारांचे फोटो व त्यांच्यावरील अत्याचाराचा उल्लेख करण्यात आला आहे. ”भ्रष्टाचारी व घोटाळेबाज उमेदवारांवर बोलण्याची वेळ येऊ नये यासाठीच सभा टाळून, भाषणबाजी टाळून मोदींनी फक्त रोडशोचाच आग्रह केला आहे”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महायुतीला लगावला आहे.