अपघात आणि हत्या वाढल्या हे चिंताजनक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. ती सुव्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते यात कितपत लक्ष घालतात याबाबत शंका आहे!

वारिशे हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून दररोज काही ना काहीतरी नवीन समोर येते आहे. हल्ला आणि हत्या या प्रकारच्या बातम्या येत आहेत. रस्त्यावरचे अपघात आणि हत्या राज्यात वाढल्या ही चिंताजनक बाब असल्याचे पवार म्हणाले. काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला, त्यानंतर एका पत्रकाराची ही अवस्था झाली. यावरून राज्य नेमके कोणत्या दिशेने चाललेय हे समजून घ्यावे लागेल, असे म्हणत पवार  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.