
सामना प्रतिनिधी । पुणे
स्वातंत्र्यलढय़ात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान होते. आणि या काँग्रेसच्या स्थापनेत अँनी बेझंट नावाच्या एका व्यक्तीचा सहभाग होता. ज्या ख्रिश्चन होत्या. असं असताना भाजपचे खासदार म्हणतात स्वातंत्र्यलढय़ात ख्रिश्चनांचे योगदान नाही, असे म्हणताना त्यांना लाज वाटायला हवी अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना फटकारले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित ‘ईद मिलन’ कार्यक्रमामध्ये पवार बोलत होते. ते म्हणाले, सध्या देशातील प्रत्येक धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱया शक्ती किरोधात सर्कानी एकत्र येण्याची गरज आहे.





























































