विजय शिवतारे बारामतीतून अपक्ष निवडणूक लढणार, शरद पवार यांनी दिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमनेसामने आलेले शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील तणाव कायम आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ही लढत प्रतिष्ठेची असताना आता महायुतीमधील मिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनीही बारामती येथून अपक्ष निवडणुक लढवण्याचे जाहीर केले आहे. यातच शिवतारे यांनी दोन्ही पवारांना पराभूत करणार असल्याचा दावा केला होता. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रत्योत्तर दिले आहे.

शरद पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष लढणार असल्याचे जाहीर के. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले विजय शिवतारे यांचे कार्यकर्ते आणि मतदार हा महाविकास आघाडीचा नाही. त्यामुळे याचा अप्रत्यक्षपणे फायदा कोणाला होणार हे पाहुया असा टोला लगावला आहे. शिवाय शिवतारे शेवटपर्यंत लढणार आहेत का हे पाहण्यासारखे असेल असेही ते म्हणाले.

याचबरोबर शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. ईडीची कारवाई आणि कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर त्यांनी धारेवर धरले. ते म्हणाले की 2014 नंतर 121 लोकांची चौकशी करण्यात आली, त्यापैकी 115 विरोधी पक्षाचे होते. ईडी विरोधी पक्षासाठी आहे. आमच्या काळात ईडीने राजकीय कारणांमुळे कारवाई कधी केली नव्हती.