कोणी वाकडं पाऊल टाकलं तर त्याचा पाय काढला जाईल! पवारांचा इशारा

795
sharad-pawar-new1

#MahaElection ‘मतदानावरून इंदापूरमध्ये दमदाटी सुरू आहे. दमदाटी करणाऱ्याला सोडणार नाही. जर कोणी वाकडं पाऊल टाकलं तर त्याचा पाय काढला जाईल’ असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत पवार बोलत होते.

पवार म्हणाले, पक्ष सोडून काही नेते गेले आहेत त्यांची मला फार काळजी वाटते. या नेत्यांनी मागील पंधरा-वीस वर्षांत इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी काहीच केले नाही. हर्षवर्धन पाटील म्हणतात की, माझ्यावर अन्याय झाला. हे चुकीचे आहे. स्वतः आमदार भरणे यांनी जर माझ्यामुळे पक्षाचे नुकसान होणार असेल तर आपण घ्याल तो निर्णय मला मान्य असेल असे मला सांगितले होते. मी हर्षवर्धन पाटील यांना यासंदर्भात फोनदेखील केला होता तरी ते भाजपवासी झाले. विद्यमान आमदार भरणे यांनी थांबायला तयार आहे असे मला सांगितले होते. त्यामुळे आमदार भरणे यांच्यावर खऱया अर्थाने अन्याय झाला असता असा निर्वाळाही शरद पवार यांनी यावेळी दिला.

चुक‍ा घडल्या पण पाठीत खंजीर खुपसला नाही! उदयनराजेंचे पवारांना प्रत्युत्तर

मला लोकसभेला सत्तर हजारांची आघाडी तालुक्यातील जनतेने दिली आहे. परंतु आता दत्तात्रय भरणे यांना एक लाखाचे मताधिक्य द्या असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, प्रदीप गारटकर, प्रवीण माने, दशरथ माने, रत्नाकर मखरे, विठ्ठल ननावरे, महारुद्र पाटील, स्वप्नील सावंत, संजय सोनवणे, छाया पडसळकर, दशरथ डोंगरे, उत्तमराव फडतरे, रणजीत निंबाळकर, सचिन सपकाळ, शुभम् निंबाळकर, डॉ. शशिकांत तरंगे, श्रीधर बाब्रस, दत्तात्रेय मोरे, दत्तात्रेय बाबर, बबनराव खराडे उपस्थित होते.

पक्ष सोडणाऱ्याला थारा देऊ नका!
कर्मयोगी शंकरराव पाटील यांनी कधीही काँग्रेसचा विचार सोडला नाही. राजेंद्र घोलप हे काँग्रेसच्या विचाराचे होते. इंदापूर तालुका हा नेहरू-गांधी यांच्या विचाराला मानणार आहे.परंतु जे तालुक्यातील नेते चुकीच्या रस्त्याने गेले आहेत अशा पक्ष सोडणाऱया नेत्याला जनता थारा देणार नाही हे मतदारांनी दाखवून द्यावे आणि भरणे यांना निवडून देण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले.

धारावी विधानसभेचे शिवसेना उमेदवार आशिष मोरे यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. त्यावेळी साऊथ इंडियन अभिनेते देव गिल. सोबत श्रीधर पाटणकर, आमदार बाबुराव माने, उद्योजक डॉक्टर प्रशांत कोंडुसकर, नगरसेवक अरविंद भोसले, देवांग सेठ व शेकडो पुरुष व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या