परीवर्तन ही काळाची गरज आहे – शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परिवर्तन ही काळाची गरज असून महाराष्ट्रात परिवर्तन होऊन आघाडीचे सरकार येणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदगीर येथे जिल्हा परिषद मैदनावर आयोजित जाहीर सभेत व्यक्त केले. गेल्या पाच वर्षात सोळा हजार शेतकऱ्यानी आत्महत्या केल्या आहेत . शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत.विकास थांबला असून बियाणे, औषधींच्या किंमती वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी केले पाहिजे, सत्तर हजार कोटी कर्ज आघाडी सरकारने माफ केले होते. मुख्यमंत्री भाषणामध्ये पवार साहेबांनी काय केले हे विचारता पण त्यांनी काय केले हे सांगत नाहीत. आम्ही अनेक शिक्षण संस्था काढून सर्वाना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, अनेक कारखाने काढून रोजगार निर्मिती केली, मी बॅकेचा संचालक नसताना ईडीमध्ये नाव गोवले गेले. सरकारने दिलेली अनेक आश्वसने पूर्ण केली नाहीत. आमचे उमेदवार संजय बनसोडे यांना प्रचंड मतानी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार संजय बनसोडे ,माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आ.विक्रम काळे , राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर आदी उपस्थीत होते.