
सामना प्रतिनिधी, ठाणे
शारदा विद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची दिवाळी गोड झाली असून त्यांच्याही आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण झाला आहे. विराट व सामाजिक संस्थेच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर आनंद तसेच समाधानाचे भाव यावेळी तरळले.
विराट व सामाजिक मंचच्या वतीने ठाणे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात येते. वृद्धाश्रमांमधील वृद्धांनाही गरजेच्या वस्तू दिल्या जातात. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शारदा विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना दीपावलीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आल्याचे ठाणे जिल्हाप्रमुख व सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी सांगितले. शाळेच्या वसतिगृहामध्ये 110 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत असून, प्रत्यक्षात शासनाकडून 24 विद्यार्थ्यांचीच मान्यता आहे. उर्वरित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या विचार करून त्यांना मदत करण्याचे आश्वासन नरेश म्हस्के यांनी दिले.
याप्रसंगी उपविभागप्रमुख रमण बटकले, शाखाप्रमुख महादेव पवार, महाड शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रमोद गोगावले, महेंद्र म्हस्के, शशिकांत माळी, सतीश हिंगे, उदय किलजे, प्रकाश लासे, प्रकाश गावकर, नीलेश मोरे, काशीनाथ मालुसरे, सुनील मालुसरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
summary- sharada hostel students celebrate diwali




























































