शार्दुल ठाकूरची दुहेरी उडी, आयसीसी कसोटी गोलंदाजी, फलंदाजी क्रमवारीत घेतली झेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे हिंदुस्थानच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरलेल्या शार्दुल ठाकूरने ‘आयसीसी’च्या ताज्या कसोटी क्रमवारीत दुहेरी फायदा झाला. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाडय़ांवर त्याने क्रमवारीत मोठी उडी घेतली.

‘आयसीसी’ने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये शार्दुल ठाकूरने फलंदाजी क्रमवारीत 138 व्या स्थानावरून थेट 79व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. ओव्हल कसोटीमध्ये शार्दुल ठाकूरने दोन्ही डावांमध्ये अर्धशतके ठोकून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचाच परिणाम म्हणून त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. दुसरीकडे गोलंदाजीमध्येदेखील शार्दुल ठाकूरने 56 व्या क्रमांकावरून 49 व्या स्थानी झेप घेतली आहे.