शेअर बाजाराचा उच्चांक, शेवटच्या अर्ध्या तासात गुंतवणूकदारांनी कमावले अडीच लाख कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशांतर्गत शेअर बाजाराने आज उच्चांकाची नोंद केली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 514 अंशांनी वाढून 57852 वर बंद झाला तर निफ्टी 158 अंकांनी वाढून 17234 वर बंद झाला. गुंतवणूकदारांनी शेवटच्या अर्ध्या तासात अडीच लाख कोटी रुपये कमावले अशी माहिती तज्ञांनी दिली. व्याजदर न वाढवण्याचे वृत्त अमेरिकेतून आले आणि देशांतर्गत बाजारामध्येही महागाई कमी झाली. याच कारणास्तव परदेशी गुंतवणूकदार खूश झाले आणि गुंतवणूक वाढल्याने बाजारही वधारला असे अर्थतज्ञांचे म्हणणे आहे. टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, टायटन या कंपन्यांच्या शेअर्सनी आज बाजारात उसळी घेतली, तर एम ऍण्ड एम, बजाज ऑटो, बजाज फायनान्स सर्व्हिसेस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. टीसीएस कंपनीच्या शेअरमध्ये 3.5 टक्क्यांनी वाढ होऊन तो 3848 रुपये झाला.