
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात तेजी दिसून आली. निफ्टी 87.15 अंकांनी वाढून 11,428.30 वर पोहचला होता. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 291.62 अकांनी वाढून 38,506.09 वर पोहचला होता. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. या तीन दिवसात मुंबई बाजाराचा निर्देशांक 626 अंकांनी वाढला. तर निफ्टीत 190 अंकांनी वाढ झाली.
वेदांता, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, ओएनजीसी, हिरो मोटोकॉर्प, मारुती, एचयूएल आणि कोटक बँकेच्या शेअरमध्ये तेजी होती. इंडसइंड बँक, बजाज ऑटो,एचडीएफसी बँक,यस बँक ,एनटीपीसी,आयटीसी, टाटा स्टील, पावरग्रीड आणि एसबीआयचे शेअरही तेजीत होते. तर एअरटेल, इन्फोसिस, टाटा मोटर्स,एचसीएल आणि टेक महिंद्राचे शेअरचे भाव घटले होते.
सोमवारी आयआरसीटीसीचे शेअर लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशी घसरले. मंगळवारी बाजार बंद होताना शेअरची किंमत 713.10 वर होती. मंगळवारी आयआरसीटीसीच्या आयपीओची लिस्टिंग 644 रुपये प्रतिशेअर होती. तर याचे पाइस बँड 315-320 रुपये होते. बाजारात हा शेअर 743.80 पर्यंत पोहचला होता. सोमवारी बाजार बंद होताना याची किंमत 728.60 रुपये होती. म्हणजे लिस्टिंगपेक्षा यात 13 टक्क्यांनी वाढ झाली होती.

























































