
प्रसिद्ध गुप्तहेर शेरलॉक होम्सच्या कादंबरीतील एका पानाचा लिलाव झाला असून या पानाला 4 लाख 23 हजार डॉलर्सची म्हणजेच 3.3 कोटी रुपयांची बोली लागली. अमेरिकेत नुकताच हा लिलाव झाला.
लेखक आर्थन कोनन डॉयल यांनी शेरलॉक होम्सला जिवंत करताना 1902 साली ‘द हाऊंड ऑफ बास्करव्हिले’ ही कादंबरी लिहिली होती. त्या कादंबरीतील डायलच्या हस्ताक्षरातील हे पान आहे. या पानात होम्स आणि डॉ. वॉटसन संशयिताच्या अटकेची चर्चा करतात असा मजकूर असून यातील एक ओळ स्क्रीप्टमध्ये सुधारणा करताना डायलने खोडलेली दिसत आहे. डॉयलने 1894 साली शेरलॉक होम्सचा मृत्यू झाल्याचे कथानक लिहून शेवट केला होता. पण त्यानंतर वाचकांनी शेरलॉक होम्सला परत आणा असा तगादा लावला.




























































