ऐतिहासिक व क्रांतीकारी निर्णय-शेषराव मोरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नांदेड

राज्यघटनेमधील 370 वे कलम रद्द करण्याची तरतूद असलेली विधेयक देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत मांडले. भारतीय जनता पक्षाचा हा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतीकारी आहे, अशा शब्दात काश्मीरचे अभ्यासक व विचारवंत शेषराव मोरे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया सामनाशी बोलताना व्यक्त केली.

ते म्हणाले की, या निर्णयामुळे हिंदुस्थान एकसंघ होण्यास मदत होणार आहे. यामुळे जम्मू आणि लडाख यांचाही प्रश्न मिटणार आहे. शेषराव मोरे यांनी काही दिवसापूर्वी यासंदर्भात सामनाशी बोलताना केंद्र शासनाचा जम्मू आणि काश्मीरचे त्रिभाजन करण्याचा विचार असल्याचे सांगितले होते. केंद्र शासनाने घेतलेला हा निर्णय शेषराव मोरे यांच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब करणारा आहे. या निर्णयाचा राजकीय परिणाम काय होईल असे विचारले असता शेषराव मोरे म्हणाले की, वोट बँकसाठी 370 व्या कलमाला चिकटून राहणारे पक्ष आता तोंडघशी पडले आहेत. त्यांच्याकडून या निर्णयास विरोध होणे अपेक्षितच होते. परंतू केंद्र शासनाने काश्मीरात सैन्य पाठवून जो प्रतिबंधक उपाय केला आहे त्यामुळे या विरोधामुळे फारसे नुकसान होणार नाही.