नाशिक भागामध्ये 7 लाख 53 हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र

474

राज्य सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोमवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून नाशिक विभागामध्ये सात लाख 53 हजार 103 शेतकरी पात्र ठरले असून त्याची रक्कम 5 हजार 600 कोटी रुपये एवढे आहे. पुढील कर्जमाफीची यादी 28 तारखेपासून लावण्यात येईल, अशी माहिती नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अप्पर जिल्हाधिकारी सोनपसारे ,जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर आदी यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त माने म्हणाले की, राज्य सरकारने आजपासूनपासून कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे असून सात लाख 53 हजार 103 शेतकरी यामध्ये पात्र ठरले आहेत. 28 तारखेला दुसरी यादी प्रसिद्ध होऊन टप्प्याटप्प्याने ही योजना पूर्णत्वाला न्यायची आहे. नगर जिल्ह्यातील जखणगाव ,राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात आली आहे. या सर्व याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. आगामी काळामध्ये ज्या याद्या प्रसिद्ध होतील, त्यात तहसीलदार, सोसायटीत, जिल्हा बँक, नॅशनल बँक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्वत्र लावण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. दोन दिवसांमध्ये जे शेतकरी पात्र झाले आहे व ज्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे, त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये तीन लाख 51 हजार 722 शेतकरी असून त्यांची रक्कम दोन हजार 296 कोटी रुपये एवढी आहे. आज 972 शेतकरी प्रात्र झालेले आहेत. एका शेतकऱ्याची फक्त आधार लिंक न झाल्यामुळे त्याची तक्रार देण्यात आली असून 24 तासाच्या आत तिचे निराकरण करून संबंधीच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे. तक्रार निवारणासाठी तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर कमिटी नेमण्यात आली असेही त्यांनी यावेळी सांगितले. 28 तारखेला दुसरी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी यावेळी सांगितले. जिल्हा उपनिबंधक अहिरे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीने नियोजन केले आहे, याची विस्तृत माहिती यावेळी सादर केली.

आपली प्रतिक्रिया द्या