
शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. यातच कारवाईच्या भीतीने काही ठिकाणी बससेवा सुरू झाली आहे. राज्यातील सर्वाधिक बसेस नगर जिह्यातील शेवगाव तालुक्यातून धावल्या आहेत.
एसटी प्रशासनाच्या आवाहनाला नगर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये आतापर्यंत 108 बसेस सुरू झाल्या आहेत. यामध्ये शेवगाव आगाराने राज्यात आघाडी घेतली आहे. तेथे सर्वाधिक बसेस शेवगावमधून धावत आहेत. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन हाती घेतल्याने सध्या प्रवाशांची गौरसोय होत आहे.
कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य झालेल्या असून, काही मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आजपर्यंत एसटीचे 1138 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.



























































