शिल्पा आईसह डान्स प्लसमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

डान्स प्लस या लोकप्रिय डान्स शोचे चौथे पर्व लवकरच सुरू होत आहे. ‘सपने सिर्फ अपनें नही होते’ हा संदेश देणार्‍या या मंचावर शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांनी विशेष अतिथीच्या रूपात मेगाऑडियन्समध्ये उपस्थित राहिल्या. शिल्पाने सांगितले की, “माझी आई माझी प्लस असून तिने माझ्यासाठी खूप त्याग केला आहे. जेव्हा  मी बॉलीवूडमध्ये  काम करायला सुरुवात केली तेव्हा वडिलांनी एकच  अट घातली की शूटिंगच्या वेळी आईने सेटवर माझी सेबत करायची. तेव्हापासून आईने स्वतःची नोकरी सोडली आणि शिल्पाला पूर्ण पाठिंबा दिला. डान्स प्लस हा शो दर शनिवार, रविवारी रात्री 8 वाजता स्टारप्लसवर बघता येईल.