देवाभाऊचे सरकार चालू! अंबादास दानवे यांची टीका

महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात प्रहार संघटनेच्या ऑफिससाठी जागा देण्यात आली होती. मात्र प्रहार संघटनेच्या ऑफिसची जागा आताच्या फडणवीस सरकारने काढून घेतली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात सुरु करण्यात आलेल्या एक-एक योजना देवेंद्र फडणवीस बंद करत आहेत. यातच हा मिंधे गटाला आणखी एक धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. यावरूनच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी मिंधेंना टोला लगावला आहे.

X वर एक पोस्ट करत अंबादास दानवे म्हणाले आहेत की, “प्रहार संघटनेच्या ऑफिसची जागा सरकारने काढून घेतली. हे देवेंद्र फडणवीसांच्या एका फोनवर गुवाहाटीच्या विमानात बसल्याचे ओमप्रकाश कडू यांना मिळालेले रिटर्न गिफ्ट आहे.” ते पुढे म्हणाले आहेत की, “शिंदेंच्या काळातील योजना बंद.. शिंदेंनी दिलेले पक्षाचे ऑफिस बंद.. देवाभाऊचे सरकार मात्र चालू!”