
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत यांनी साईबाबांच्या चरणी 1 कोटी 51 लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. दिपाकलीच्या मुहूर्तावर अनंत अंबानी यांनी शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन घेतले आणि मध्यान्ह आरतीला उपस्थित राहत त्यांनी साईंची मनोभावे पूजा अर्चा केली. या महिनाभरात दोनवेळा त्यांचा नियोजित दौरा रद्द झाला होता. अखेर अनंत अंबानी यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर शिर्डीतील साईबाबा मंदिराला भेट दिली. साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी अनंत अंबानी यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान, अनंत अंबानी यांनी शिर्डी साई संस्थानला तब्बल 1 कोटी 51 लाख रुपयांची देणगी दिली. मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे त्यांनी देणगीचा चेक सुपूर्द केला.






























































