
हरियाणाचे डॉ. शिव दर्शन मलिक यांनी गाईच्या शेणापासून वैदिक घर बनवण्याचे तंत्र विकसित केले आहे. ते गाईच्या शेणापासून विटा आणि वैदिक प्लास्टर तयार करतात. हे प्लास्टर सिमेंटसारखे काम करते. वैदिक घरात उन्हाळ्यात वातावरण थंड राहते. म्हणजे बाहेर तापमान 40 डिग्री असेल तर या घरात 28 ते 31 डिग्रीपर्यंत रहाते. तसेच घरातील हवादेखील शुद्ध राहत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
डॉ. शिव दर्शन मलिक हे मूळचे रोहतक जिल्हय़ातील मदिना गावातील. त्यांनी केमिस्ट्रीमधून पीएचडी केली आहे. 2000 साली आयआयटी दिल्लीच्या सहकार्याने गोशाळांमधून निघणाऱया कचऱयावर तसेच अॅग्री वेस्टमधून ऊर्जा तयार करण्याच्या प्रकल्पावर काम केले.
n शेणापासून तयार केलेल्या एका विटेचे वजन अंदाजे 1.75 किलो असते. तिला बनवायला फक्त 4 रुपये खर्च येतो. शेणापासून वीट आणि वैदिक प्लास्टरचा वापर करून घर बनवण्याचा खर्च 10 ते 12 रुपये चौरस फूट इतका होतो.

























































