गव्हाच्या पिकापासून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे. या निमित्त शिवप्रेमींकडून विविध प्रकारे महाराजांची प्रतिकृती साकारून अभिवादन केले. राहाता तालुक्यातील लोणी येथील एका तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात गव्हाच्या पिकापासून महाराजांची प्रतिकृती साकारली आहे.

कुणाल विखे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून त्याने गव्हाच्या पिकापासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारली आहेय. राहाता तालुक्यातील लोणी गावात ही प्रतिकृती साकारण्यात आली असून यासाठी 5 दिवसांपासून तो प्रयत्नशील होता.

सुरुवातीला शिवरायांची रांगोळी काढून त्यामध्ये गव्हाचे बी टाकून त्यास पाणी दिले. गहू उगवून येण्यासाठी 5 ते 6 दिवसांचा कालावधी लागला. या प्रतिकृतीची लांबी 24 फूट असून रुंदी 18 फूट आहे. यासाठी 10 किलो गव्हाच्या बियांचा वापर करण्यात आला.