#५३वर्षेशिवसेनेची : उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

29

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेनेचा 53 वा वर्धापनदिन शीव येथील षण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केले. वाचा उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –

 • आपण एक शपथ घेऊया, तुटणार नाही फुटणार नाही आणि हिंदुत्वाचा वसा प्राण गेला तरी सोडणार नाही.- उद्धव ठाकरे
 • व्यासपीठ फक्त षण्मुखानंद नाही, व्यासपीठ पूर्ण महाराष्ट्र आहे आणि ते संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. -उद्धव ठाकरे
 • ओवैसी हिंदूचा अपमान करत असताना आम्ही गप्प बसणार नाही – उद्धव ठाकरे
 • कलम 370 आम्ही काढणार म्हणजे काढणारच, काश्मीर वर आमच्या देशाचा हक्क आहे.-उद्धव ठाकरे
 • जे सावरकरांना डरपोक म्हणत होते, त्या नालायकांचा दणदणीत पराभव झाला आहे. – उद्धव ठाकरे
 • युतीतील दुरावा आता दूर झाला आहे, विजयानंतर भाजपचे खासदारही भेटायला आले, शिवसेनेच्या व्यासपीठावर अनेकदा भाजपचे नेते आले आहेत – उद्धव ठाकरे
 • संजय दादांच्या कोल्हापूरच्या सभेत एक चांगलं वाक्य केलं होतं, ‘आमचं ठरलंय!’ आणि आता आमचं पण ठरलंय! – उद्धव  ठाकरे
 • आपला वाद होता ते तुझं माझं करण्यासाठी नाही होता, आपला वाद मूलभूत मुद्द्यांसाठी झाला होता. – उद्धव ठाकरे
 • आता वेडात मराठे दौडले सात नाही, तर एक ‘साथ’ दौडणार – उद्धव ठाकरे
 • ज्या एका भावनेने युती आपण त्या वेळेला केली होती ती आजही त्याच भावनेने केली आहे. -उद्धव ठाकरे
 • प्रत्येक शिवसैनिक प्रेम करताना जीव लावतो, तर लढताना जीवही देतो – उद्धव ठाकरे
 • मी प्रामाणिकपणे सांगतो, संघर्षाच्या वेळी मला शिवसेनाप्रमुखांची आठवण येत नाही, कारण असे शिवसैनिक वीर सवंगडी त्यांनी मला दिले आहेत. -उद्धव ठाकरे
आपली प्रतिक्रिया द्या