…नाहीतर तो दौरा म्हणजे करदात्यांच्या पैशाने केलेली सहलच, आदित्य ठाकरे यांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 1 ऑक्टोबर पासून परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. दहा दिवसांच्या या परदेश दौऱ्यात ते बर्लिन आणि लंडन या शहरांचा दौऱा ते करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत त्यांच्यासोबत असणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आगामी दौऱ्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही तसेच मागील दावोस दौऱ्याचे कोणतेही अपडेट्स सरकारकडून देण्यात आलेले नव्हते. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

”बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांनी आठवडाभराच्या परदेश दौऱ्याचे नियोजन केले आहे. आपल्या देशाला किंवा राज्याला गुंतवणूक किंवा ओळख मिळवून देणार्‍या परदेश दौऱ्यांवर माझा आक्षेप नसणारच पण हा दौरा देखील त्यांच्या दावोसच्या सहलीसारखा असू नये. ज्या दौऱ्यावप सरकारने 28 तासांसाठी जवळपास 40 कोटी खर्च केले. दावोसच्या कोणत्याही बैठकीचे वेळापत्रक नाही, फोटो नाहीत. दावोस ट्रिपच्या खर्चाचा खरा आकडा सरकार अजूनही लपवत आहे. आता, मुख्यमंत्री कार्यालयानेने त्यांच्या या 10 दिवसांच्या सहलीचे वेळापत्रक दौऱ्यावर जाण्यापूर्वी जाहीर केले पाहिजे आणि दावोस सहलीसाठी केलेल्या त्यांच्या बैठकांचे फोटो ट्विट करणे आवश्यक आहे. एखाद्याच्या सुट्टीसाठी दिवसाचे काम एका आठवड्यापर्यंत वाढवू नये. नाहीतर हा दौरा नाही तर करदात्यांच्या खर्चाने केलेली सहलच”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.