महानगरपालिका भ्रष्टाचारमुक्त करणार! – अनिल राठोड

16

सामना प्रतिनिधी । नगर

महानगरपालिकेमध्ये अधिकार्‍यांनी तसेच संबंधीत अभियंत्यांनी साटेलोटे करुन भ्रष्टाचार केले आहेत. या संदर्भात आम्ही माहिती अधिकारात माहिती मागवली आहे. धक्कादायक माहिती उजेडात येऊ लागल्याने अभियंते आता धास्तावले गेले आहेत. या सर्व अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशी होवून कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर शिवसेना लोकायुक्तांकडे दाद मागणार असून भ्रष्टारमुक्त महानगरपालिका आम्ही करणार असल्याचे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर सुरेखा कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदी उपस्थित होते

राठोड म्हणाले, महानगरपालिका भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी शिवसेने कंबर कसली असून याचा अधिकार्‍यांनी धसका घेतला आहे. आम्ही या सर्व प्रकरणाची सर्व माहिती मागवली असून कागदपत्र मिळाल्यानंतर यांचा भ्रष्टाचार बाहेर काढून लोकायुक्तांकडे दादा मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वेळेला बोगस बिले, बोगस कामे होवून लोखो रुपये लाटले गेले आहेत, यांची संपत्तीसुध्दा अवाढव्य अशी झाली आहे. नोकरीला लागते वेळे यांनी जे विवरण पत्र भरुन दिले आहे त्यापेक्षा कितीपट ही संपत्ती आहे याचाही भविष्यात पर्दापाश करणार असल्याचे राठोड म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या