शिवसेनेचे संख्याबळ 95 होणार,भाजपच्या दोन, तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे पद रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

पालिकेतील भाजपच्या दोन आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर संबंधित तीनही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाल्याचे महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज महासभेत जाहीर केले. यामुळे संबंधित वॉर्डमधील शिवसेनेचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे संख्याबळ 93 वरून 95 होणार आहे.

जात पडताळणी समितीने भाजपच्या दोन आणि काँग्रेसच्या एका नगरसेककाचे जात प्रमाणपत्र अकैध ठरवले होते. त्यामुळे संबंधित आरक्षित जागेकर निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपले पद धोक्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवत प्रमाणपत्र अवैधच असल्याचा निर्णय दिला. यामुळे प्रभाग क्र. 28 मधील काँग्रेसचे राजपती यादव, प्रभाग क्र. 76 मधील भाजपच्या केशरबेन पटेल आणि प्रभाग क्र. 81 मधील मुरजी पटेल यांचे नगरसेवक पद रद्द होणार आहे. या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेचे शंकर हुंडारे आणि संदीप नाईक तर काँग्रेसचे नितीन सलाग्रे हे विजयी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अशी होणार प्रक्रिया

नगरसेवक पद रद्द झालेल्या ठिकाणचे तीनही वॉर्डमधील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार आता लघुवाद न्यायालयात आपण विजयी असल्याचा दावा करू शकणार आहेत. या ठिकाणी त्यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर पुन्हा पालिकेच्या महासभेत महापौर याबाबतची अधिकृत घोषणा करतील. त्यानंतर शिवसेनेचे दोन आणि काँग्रेसचा एक नगरसेवक वाढेल.

पालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल

  • शिवसेना -93
  • भाजप-85
  • काँग्रेस-30
  • राष्ट्रवादी काँग्रेस-9
  • समाजवादी-6
  • एमआयएम-2
  • मनसे-1
  • एकूण-227

जात पडताळणी समितीचा निर्णय कायम

निवडून आल्यानंतर नगरसेवकांना एका कर्षात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते, मात्र जात पडताळणी समितीच्या निर्णयामुळे संबंधित नगरसेककांचे पद धोक्यात आले होते. याविरोधात संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु पती-पत्नी असलेल्या भाजपच्या केशरबेन पटेल, मुरजी पटेल आणि काँग्रेस नगरसेवक राजपती यादव यांच्याबाबत जात पडताळणी समितीचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला होता.