Ratnagiri News – उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात कारवाई करा; शिवसेनेची मागणी, तक्रार दाखल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. आज (15 ऑक्टोबर 2025) शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे यांनी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गणपतीपुळे येथील अमित घनवटकर याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी अवनानकारक फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली. माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे यांनी जयगड पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकांना निवेदन देत अमित घनवटकरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, विभागप्रमुख उत्तम मोरे, युवासेना तालुका समन्वयक साईनाथ जाधव, उपतालुकाप्रमुख रोहित साळवी, दत्ताराम आंग्रे, हरिनाथ शिवगण, वसंत फडकले, शिरीष गुरव उपस्थित होते.