अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन

अवकाळी पावसाने तडाखा दिल्यामुळे विदर्भ-मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात शेतीचा अक्षरशः चिखल झाला. कर्जाच्या विळख्यात आणखी फसलेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या पीक विमा योजनेअंतर्गत तक्रार देण्याचा प्रयत्न केला; परंतु अॅप काम करत नाही, तक्रार नोंदवता येत नाही आणि टोल फ्री क्रमांकही काम करत नाही. या पार्श्वभूमीवर तातडीने पंचनामे करून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज बुधवारी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने सरकारला देण्यात आला.

विमा कंपन्या लक्ष देत नसून शासनाने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. त्या अनुषंगाने आज शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन दिले आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने विविध मागण्या करण्यात आल्या. पाणीपट्टी, वीज बिल माफ करण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्या उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.  यावेळी रामटेक सहसंपर्कप्रमुख उत्तम कापसे, तालुकाप्रमुख सुधाकर हटवार, हरिभाऊ लोहबरे, नगरसेवक शिवराज माथुरकर, सरपंच अक्षय पंचबुधे, युवासेना शहरप्रमुख जितु साठवणे, किशोर कानफाडे, प्रमोद बरबटे, प्रवीण कोरमोरे, दिगंबर बांगलकर, बंटी हटवार, दामू ठाकरे, सचिन तिघरे, प्रदीप मेहर, प्रदीप पोटपह्टे, हरिओम पंचबुढे, मुन्ना वैरागडे, यशवंत गायधणे, प्रफुल म्हहले, सुधाकर कानफाडे, पांडे, सचिन वंजारी, दुर्गेश वैद्य, मोतीराम सोमनाथे, अनुराग पुंभलकर, उमेश भोतमांगे, नाना ठाकरे, नंदू दहाके, शरद हिंगे, केशव धोबळे, सतीश वानखेडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक आणि शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.

या आहेत मागण्या

  1. शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसकट माफ करावे
  2. शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी
  3. शेतकऱ्यांचे कृषिपंपाचे वीज बिल माफ करावे
  4. पेंच प्रकल्पाची पाणीपट्टी माफ करण्यात यावी
  5. पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर जमा करावा